राहुरी: बिबट्यांचा वाढता उच्छाद; देवळाली प्रवरासह ३२ गावांत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची शिवसेना शेतकरी सेनेचे मागणी
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह ३२ गावांमध्ये शेतीसाठी रात्री दिला जाणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून, जीविताला धोक्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेना यांनी केली आहे. याबाबत आज शुक्रवारी दुपारी देवलाली प्रवरा येथील अभियंत्यास निवेदन देण्यात आले आहे.