तालुक्यातील केळझर गावातील ९ वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) सायंकाळी घडली. आर्यन किशोर बावणे (वय ९ वर्षे, रा. केळझर) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून, या घटनेनंतर आर्यनचे वडील किशोर बावणे यांनी ता. १५ सोमवाराला मध्यरात्री २ वाजता तक्रार दाखल केल्यावरून सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.