सावळ्घाटातील अपघात स्थळाला अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. 15 डिसेंबर पासून हा मार्ग बंद करून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असले तरी अद्याप पर्यायी मार्गाचे काम न झाल्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी कायम दिसून आली. यासंदर्भात सावळ्या पवळ्या या घाटाचे तात्काळ काम पूर्ण करून अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी प्रवाशांनी केली. यावेळी पेठचे पोलीस निरिक्षक व्दारकानाथ गोंदके यांचेसह गोकूळ झिरवाळ व कार्यकर्त उपस्थित होते.