पवनी ते भंडारा मार्गावरील बाम्हणी फाट्याजवळ ६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका पिवळ्या रंगाच्या अज्ञात ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. MH-36-AL-9025) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वाल्मीक गोमाजी उईके (वय ५० वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश वाल्मीक उईके (वय २५ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.