जिल्ह्यातील बाल कामगार निर्मूलनासाठी कोणतेही कारण न देता कामाची गती वाढवावी, तसेच बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 ची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वीटभट्ट्या, हॉटेल, ढाबे, गॅरेज आदी ठिकाणी नियमित भेटी देऊन बाल कामगार आढळून आल्यास नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.