जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविल्या जाणाऱ्या अहवालात कुठल्याही त्रुटी येऊ न देता स्वस्त धान्याचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सोळा हजारांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात यांना 'एसीबी'च्या पथकाने रंगेहात पकडले. १४ नोव्हेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास सापळा कारवाई यशस्वी झाली.