जामनेर: जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज ऑनलाईन भरुन प्रिंट सादर करण्याचे निवडणूक निर्णय अधिकारींनी केले आवाहन
Jamner, Jalgaon | Nov 12, 2025 जामनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना आधी तो ऑनलाईन पद्धतीने भरावा आणि त्याची प्रिंट काढून स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे आवाहन दि. १२ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.