अंबाजोगाई: दिवाळीच्या सणातही सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारी न केल्याने अंबाजोगाई सफाई कर्मचारी आक्रमक झाले
Ambejogai, Beed | Oct 24, 2025 अंबाजोगाईत दिवाळीच्या सणातही सफाई कर्मचाऱ्यांचे हाल पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा आक्रोश अंबाजोगाई नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने दिवाळीच्या सणातही त्यांच्या घरात अंधाराचे वातावरण आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात आज सफाई कर्मचारी आक्रमक झाले असून, "तात्काळ आमचे पगार करण्यात यावेत," अशी त्यांनी ठाम मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जर सोमवारपर्यंत पगाराचा प्रश्न निकाली न काढल्यास ते नगरपरिषदेसमोर सामूहिक आमरण उपोषण