चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगावचे आराध्य दैवत आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा संदल आणि तलवार मिरवणूक सोहळा ५ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या सोहळ्याला प्रशासकीय ढिसाळपणाचे गालबोट लागले आहे. "भाविक उपाशी आणि ट्रस्ट तुपाशी" अशीच काहीशी अवस्था यंदा पाहायला मिळत असून, कडाक्याच्या थंडीत भाविकांना उघड्यावर रात्र काढावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.