सोयगाव: सोयगाव तहसीलदार यांना पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या भाजपा शिष्टमंडळाचे तहसीलदार यांना निवेदन
आज दिनांक 4 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष मुलतानी यांच्या मार्गदर्शन खाली भाजपाच्या शिष्टमंडळाने सोयगाव तहसीलदार मनीषा मेनी यांना निवेदन देत पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे