सिरोंचा: टेकडाताला गावात सात दिवसापासून वीज पुरवठा खंडित
गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा तालुक्यातील टेकडाताला या गावात मागील सात दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामना करावा लागत आहे. गावात एका ताडाचे झाड मुख्य लाईन वरील तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा कायमचा खंडित झाला. दुसऱ्या डीपी वरून तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला असला तरीही हा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. होल्टेजचे प्रमाण खूपच कमी असते त्यामुळे अनेकांचे विद्युत उपकरणे खराब झाले आहेत.