उमरखेड: पोलीस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज ; शहरात बाहेरगावरून आलेले मुले, मुली करत आहे एका पक्षाचा प्रचार
उमरखेड शहरातील नगरपालिका निवडणुकीसाठी बाहेर गावाहून काही तरुण मुले आणि मुली एका पक्षाच्या प्रचार करण्यासाठी शहरात हिंडत फिरत आहेत. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी ते दर्पण पत्रकार संघाच्या कार्यालयावर येऊन प्रचार करत असताना विचारलेल्या प्रश्नला आडवे तिकडे उत्तर देऊन तुम्हाला मत द्यायचं तर द्या नाहीतर देऊ नका अशा पद्धतीची आरे रावीची भाषा वापरली. याचा एक व्हिडिओ दिनांक 22 नोव्हेंबर रोजी अंदाजे सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.