रंभापुर फाटा ते अकोट या मार्गाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालु आहे.दोन्ही साईडा खोदुन ठेवल्याने वाहतुकीस अडथळा येत होता.हे काम जलदगतीने करण्यासाठीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने सावरा फाटा येथे १२ डीसें.ला रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले..याचा धसका घेत संबधीत विभागाचे अधीकारी व ठेकेदार हे सावरा फाटा येथे येऊन त्यांनी संबंधीत मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे खोदकामावर एक तासातुन पाणी मारण्यासाठी टंकरची तत्काळ वाढ करण्यात आली.