बुलढाणा : मा. केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच लोकसभा खासदार (बुलढाणा मतदारसंघ) मा. प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सिकलसेल तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दि. १५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.