मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसीला धरले धारेवर, व्हिडिओ व्हायरल
मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी चढलेल्या टीसीने इतर प्रवाशांचे तिकीट तपासले पण काहींनी आपण स्टाफ असल्याचं सांगताच त्यांचं तिकीट तपासलं गेलं नाही असा व्हिडीओ आज शुक्रवार दिनांक १६ मे रोजी दुपारी दोन वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे