हिंगणा मतदार संघातील नगरपरिषद वाडी येथे भाजपचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री नरेश भाऊ चरडे तसेच नगरसेवक व नगरसेविका यांचा पदग्रहण कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ ऋचा धाबर्डे यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे पुष्पगुछ देवून अभिनंदन केले. यानंतर नरेश भाऊ यांनी पदभार स्वीकारला. तेव्हा मी पण त्यांना तसेच सर्व नगरसेवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ प्रतीक्षाताई पाटील, आदी उपस्थित होते .