इंदापूर: भाजपची लोक बोलतात तशी नाहीत ती फसवी - आ.रोहित पवारांचा लाखेवाडीतून हल्लाबोल
Indapur, Pune | Apr 22, 2024 भाजपची लोक बोलतात तशी नाहीत ती फसवी लोक आहेत असा हल्लाबोल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी मधील जाहीर सभेत केलाय. रोहित पवारांची जाहीर सभा लाखेवाडीत पार पडलीय. या सभेमध्ये रोहित पवारांनी भाजप वरती जोरदार निशाणा साधलाय. कर्जत जामखेड मतदार संघात अनेक मंदिरांच्या विकासाची कामे सुरू होती मात्र भाजपनेती कामे विकास निधी अडवून बंद पाडली.शेवटी कोर्टात गेलो आणि कोर्टाने यांना झापड मारली तेव्हा पुन्हा कामे सुरु झाल्याचं त्यांनी म्हटलयं.