मागील पंधरा दिवसापासून चपराड पहाडी येथील नवदुर्गा माता मंदिर परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला असून मंदिर परिसरात अनेक छोट्या व्यवसायिकांचे खूप मोठे नुकसान करीत आहे मात्र संबंधित विभागाने अजून पर्यंत अस्वलीच्या बंदोबस्त केला नाही त्यामुळे पुन्हा तारीख 25 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास मंदिर परिसरात मुक्त संचार करीत असल्याचे दिसल्याने भाविक भक्तांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी संबंधित विभागाने तात्काळ उपयोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे