नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून, भंडाऱ्यात भाजपच्या उमेदवार मधुरा मदनकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विजयाची खात्री होताच आमदार डॉ. परिणय फुके यांनी 'बाप तो बाप रहेगा' या गाण्याच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांसह आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी दंडावर थाप मारत आपला उत्साह व्यक्त केला, ज्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.