भंडारा: नागपूर-भंडारा हायवेवर ठाणा पेट्रोल पंपाजवळ मजुरांच्या पिकअपला भीषण अपघात; २० महिला जखमी, ७ जणींची प्रकृती गंभीर
भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोल पंपाजवळ नागपूर-भंडारा हायवेवर आज १९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये शेतमजुरीसाठी जाणाऱ्या २० महिला जखमी झाल्या आहेत. चालकाने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्र. MH 40/DC-1981 हे वाहन भरधाव वेगात चालवत असताना, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रोडच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. या जोरदार धडकेमुळे गाडीत बसलेल्या गोपेवाडा आणि शहापूर एकूण २० महिला मजूर जखमी झाल्या असून, त्यापैकी ७ महिलांची प्रकृती गंभीर...