कन्नड: जामडी घाट येथे माजी सरपंचाच्या मुलाचा धारदार शस्त्राने खून,राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
तालुक्यातील जामडी (घाट) येथे माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजू रामचंद्र पवार (वय ४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राजू पवार यांचे कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून गावातील राजकारणात सक्रिय आहे. राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे पाच वर्षांपूर्वी गावाचे सरपंच होते. सध्या त्यांच्या काकू रेणुका कैलास पवार या विद्यमान सरपंच आहेत.