पवनी: शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणाऱ्या वृद्धावर तिघांनी केला हल्ला...
Pauni, Bhandara | Apr 23, 2024 शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणाऱ्या वृद्धावर तिघांनी हल्ला केला. यानंतर दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी 10 वाजता दरम्यान तिघांनी त्यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. याची भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी केवळ एनसीआर नोंद घेत आरोपींना अभय दिल्याचा रोष व्यक्त होत आहे. नरेंद्र रामटेके असे 68 वर्षीय जखमी वृद्ध इसमाचे नाव आहे.