खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती यवतमाळ यांच्या विद्यमाने वडगाव रोड केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबरला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहा येथे करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी पप्पू पाटील भोयर यांनी केले.