जालना: गुंटूर एक्स्प्रेस जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान 65 दिवस रद्द. नगरसोल एक्स्प्रेस उशिरा धावणार..
Jalna, Jalna | Feb 3, 2026 गुंटूर एक्स्प्रेस जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान 65 दिवस रद्द. नगरसोल एक्स्प्रेस उशिरा धावणार.. आज दिनांक 3 मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर–जालना रेल्वे मार्गावर बीसीएम मशिनद्वारे डीप स्क्रिनिंग व देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे गुंटूर–छत्रपती संभाजीनगर–गुंटूर एक्स्प्रेस ही रेल्वे तब्बल 65 दिवसांसाठी अंशतः रद्द करण्यात आली असून, नगरसोल (काचिगुडा) एक्स्प्रेस काही दि