पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या खुरसापार येथे वडीलासोबत होत असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला जोरात ठोसा मारुन गंभीर जखमी केल्याची घटना खुरसापार येथे घडली. याबाबत चे वृत्त असे की तक्रारदार यांचे वडील सोबत आरोपीचा वाद झाला वाद विकोपाला गेल्याने मुलगा मध्यस्थी करायला गेला असता आरोपीने नाकावर ठोसा मारून गंभीर जखमी केले. तक्रारीवरून वेलतुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .