अमरावती: गावपातळीवरून आरोग्य सेवा सबळ होण्यासाठी प्रयत्न, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक यांचे प्रतिपादन
गावपातळीवरून आरोग्य सेवा सबळ होण्यासाठी प्रयत्न आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक अमरावती, दि. ६ : जनहित याचिकेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या समजून घेतल्या. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीसोबतच, यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाची सुरुवात गाव पातळीवरून होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी केले.