आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जिकठाण फाटा येथे एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाबू सिंग महेरे (४०, रा. पेंढापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बाबू सिंग महेरे हे आपल्या दुचाकीवरून संभाजीनगरच्या दिशेने जात होते. जिकठाण फाट्याजवळ अपघात झाला.