सुप्रसिद्ध अभिनेत्री व हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनी आज दि २६ डिसेंबर दुपारी ३ वाजेच्या सुमारास वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे महादेवाचे दर्शन घेतले.भावासोबत आलेल्या कंगना यांनी विधीवत अभिषेक व महापूजा केली.नाताळच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात आधीच मोठी गर्दी होती.कंगना यांच्या आगमनाने मंदिर परिसरात भक्तांमध्ये उत्साह संचारला.त्या सध्या देशातील १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचा संकल्प पूर्ण करत आहेत