कळमनूरी: आ. बाळापूर शहरात रोड रोमिओचा सुळसुळाट,रोड रोमिओ चा बंदोबस्त करण्याची भाजपाची मागणी,पोलिसांना दिले निवेदन
आखाडा बाळापूर शहरात रोड रोमिओचा सुळसुळाट झाला असून हे रोमिओ,शाळा कॉलेज भरताना रस्त्यावरून सुसाट वेगाने आपल्या गाड्या पळून हिरो गिरी करत असताना पहावयास मिळतात .त्यामुळे शहरातील नागरिकांना या रोमिओचा त्रास होतोय,तात्काळ यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असून या संदर्भात आ .बाळापूर पोलीस ठाण्याला लेखी निवेदन देण्यात आले,हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने आज दि. 24 नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे .