जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी 3 तलाठ्यांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आजपर्यंत एकूण 27 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरार आरोपी व एजंटचा शोध सुरू आहे.अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान होते.