वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे नागरी सुविधा योजनेंतर्गत विविध सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असून, या कामांच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. सदर रस्त्यांच्या कामासाठी मातीमिश्रित व नाल्यातील वाळू वापरण्यात येत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेघरे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी संबंधित विभाग तसेच कनिष