इंदापूर: धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे यांची कळस मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका
Indapur, Pune | Apr 23, 2024 इंदापूर तालुक्यातील कळस मध्ये सोमवारी दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.धनगर आरक्षणाचा निकाल हा विरोधात गेला,2014 साली बारामतीत आमच्या घरासमोर येऊन फडणवीस म्हणाले होते एकदा सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवतो.आज दहा वर्ष ओलांडली तरी देखील हा प्रश्न तसाच असल्याचं सुळेंनी म्हटलंय.