मुंडीपार-देवरी मार्गावरील कमरगाव येथील बस स्थानक परिसरामध्ये बर्निंग ट्रेलरचा थरार बघायला मिळाला.. हा ट्रेलर नवी क्रेन घेऊन जात असताना कमरगाव येथील बसस्थानकावर आग लागली... यात ट्रेलर पूर्णतः जळून खाक झाला आहे.. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी यात गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.. घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत ट्रेलर पूर्णतः जळून खाक झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण करू शकले नाही.