कळमनूरी: ईसापुर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यास मंजुरी
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत ईसापुर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यास कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती आज दि .27 नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता अ बा जगताप यांच्याकडून प्राप्त झाली आहे .पाण्याचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026, दुसरे आवर्तन 8 जानेवारी 28 जानेवारी2026, तिसरे आवर्तन 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सोडण्यात येणार आहे .