नळस्टॉप परिसरात आज सकाळी कारचा अपघात होऊन वाहन डिव्हायडरला धडकून उलटले. अचानक नियंत्रण सुटल्याने चालकाची कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि पलटी झाली. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.