स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाने सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पांढरकवडा पारधी बेडा परिसरात वॉशआऊट मोहिम राबविली. मोहिमेदरम्यान अवैध दारू निर्मितीचा मोठा साठा आढळून आला. ही कारवाई ता. 9 ला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. कारवाईदरम्यान पथकाला एकूण 1,360 लिटर गरम मोहा सडवा रसायण, 26,900 लिटर कच्चा मोहा सडवा रसायण, तसेच 247 लिटर गावठी मोहा दारू असा मोठ्या प्रमाणात अवैध साठा मिळून आला. अशी माहिती सावंगी पोलिसांनी ता. 10 ला सकाळी 8 वाजता दिली.