सेलू शहरातील पोलिस ठाण्याजवळ रविवारी सकाळी भरधाव वेगाने आलेल्या कारने शिकवणी वर्गातून घरी परतणाऱ्या मुलींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन मुली गंभीर जखमी तर चार मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (ता. १४ डिसेंबर) सकाळी सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन रोडवर घडली. सर्व जखमींना तातडीने सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर अवस्थेत असलेल्या प्रिया शिंदे, वैष्णवी गिरडकर आणि अदिती वानोडे या तिघींना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.