अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारात विहिरीत बुडून १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. प्रेमसंबंधातून आलेल्या मानसिक त्रासामुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या प्रियकरावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.