मुंबई येथील एका महिलेकडून विक्रीस आणण्यात आलेल्या संशयास्पद दहा तोळे सोन्याच्या तपासासाठी ठाणे येथील क्राईम ब्रँच पथकाने यवतमाळ जिल्ह्यात धडक दिल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सोन्याचा मूळ स्त्रोत चोरीची साखळी आणि व्यवहारातील सहभागी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे.