रियान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक व आकाशझेप फाउंडेशन रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई बुद्ध विहार बोंद्री (मनसर) येथे गुरुवार दिनांक २५ डिसेंबरला एक दिवसीय एकत्रिक आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रियान मल्टी हॉस्पिटलचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली नि:शुल्क सामान्य तपासणी सह सर्व तपासण्या करण्यात आल्या.