पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे प्रथमच पनवेलमध्ये आले. यावेळी महापौर नितीन पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.