पुणे शहर: कात्रज बाह्यवळण मार्गावरील लॉजवर फुरसुंगी पोलिसांचा छापा, देहविक्रय करणार्या ४ तरुणींची सुटका
Pune City, Pune | Dec 28, 2025 मोबाईलवरुन तरुणींचे फोटो पाठवून त्याद्वारे लॉजवर वेश्या व्यवसायासाठी तरुणींना पाठविले जात असल्याच्या बातमीवरुन फुरसुंगी पोलिसांनी कात्रज - मंतरवाडी बाह्यवळण रस्त्यावरील ऊरुळी देवाची येथील लॉज छापा घातला. तेथून ४ तरुणींची सुटका केली असून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.