औसा -उदगीर नगरपरिषदेसाठी राजकीय वातावरण तुफान तापले असतानाच निवडणूक आयोगाने ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्याने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. “उदगीर नगरपरिषद तर जिंकूनच ठेवली होती, रेनापुरात तर फक्त गुलाल उधळायचा बाकी होता… मग आयोगाने असा काय अर्थ काढला?” असा थेट सवाल आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केल्याचा त्यांचा व्हिडिओ संपूर्ण लातूर जिल्ह्यात अक्षरशः वाऱ्यासारखा सोशल मीडियावर वायरल झाला आहे.