साडेतीन लाखाचा धनादेश वटला नसल्याने आरोपीस अतिरिक्त न्याय दंडाधिकारी बीड यांनी सहा महिन्याची शिक्षा सुनावली
Beed, Beed | Nov 19, 2025 हातउसनी दिलेल्या ३,५०,००० रकमेचा धनादेश वटला नसल्याप्रकरणी आरोपी आश्रुबा बाबासाहेब तांदळे (रा. तांदळेचीवाडी, ता. बीड) यास सहा महिन्यांची साधी कैद व धनादेशाची मूळ रक्कम आणि दंड मिळून एकूण ४,७०,००० फिर्यादीस देण्याचा आदेश मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बीड यांनी दिला आहे. फिर्यादी रविंद्र गोरख भिंताडे (रा. पांढऱ्याची वाडी, ता. बीड) व आरोपीमध्ये मागील अनेक वर्षांपासून विश्वासाचे संबंध होते. त्यातूनच मे 2023 मध्ये आरोपीने व्यवसायिक आणि घरगुती अडचणी सांगत फिर्यादीकडे ३.५ लाख उसने मागितल