नांदेड: माळ टेकडी येथील तात्काळ खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी माळ टेकडी येथील रहिवाशांची महानगरपालिकेकडे मागणी
Nanded, Nanded | Nov 30, 2025 आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बाराच्या दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील मालटेकडी भागात अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ड्रेनेजचे पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोडण्यात आले होते. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रहिवाशियाणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी व तेथील रहिवाशांनी दिला आहे