साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने अवैधरित्या दारू तस्करी व हातभट्टीची दारू काढणाऱ्या दोघांवर सानगडी व जांभळी सडक याठिकाणी धाड टाकून एक लाख 15 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या दोघांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोमल धकाते व नरेश मेश्राम अशी या दोन आरोपींची नावे आहेत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या या कारवाईने अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.