कन्नड तालुकातील मोहरा गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आता टोक्याला पोहोचला आहे.गावातील गुळवे वस्तीवरील शेतकऱ्यांनी मुलभूत सुविधांच्या अभावामुळे थेट इच्छा मरण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे.वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे.रस्ता, पाणी आदी मुलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.