जिल्हा परिषदेतील माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने खळबळ उडाली
Beed, Beed | Nov 19, 2025 बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. शिक्षकांची बोगस भरती असो कि नव्याने नियुक्ती अथवा बदली या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांनी गैरकारभार केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.