यवतमाळ: जिल्ह्यात निवडणूक पुढे ढकललेल्या क्षेत्रात 20 डिसेंबर रोजी मतदान
सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलण्यात आलेल्या संपूर्ण यवतमाळ नगरपरिषद क्षेत्र व इतर नगरपरिषदांतील प्रभागांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष मतदान दि. 20 डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.