वैजापूर: जुन्या वादाच्या कारणावरून नातेवाईकाने घर पेटवले एकावर वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल, सोनवाडी येथील घटना
तालुक्यातील सोनवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एका नातेवाईकाने घराला आग लावल्याने एक गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह धान्य आणि फर्निचर जळून खाक झाले असून, पीडित महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.